महाराष्ट्र

आशाताई यांच्या निधनाने संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत; जयकुमार रावल

मुंबई: ज्येष्ठ गायिका स्व.आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्व.आशाताई यांच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 

आशाताई भोसले यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भाषांतील बारा हजारांहून अधिक गीतांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

त्यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रती असलेल्या समर्पित निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार, आणि बांगला भूषण अशा विविध प्रतिष्ठित सन्मानांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. त्यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली, असेही मंत्री श्री. रावल यांनी म्हटले आहे.

स्व. आशाताई यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे योगदान, समर्पण आणि त्यांची अजरामर गीते भारतीय संगीताच्या इतिहासात सदैव स्मरणात राहतील, यात शंका नाही. दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत, त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना हे दुःख सहन करण्याची प्रभू शक्ती देवो , अशी प्रार्थना मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

11 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

11 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

11 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

11 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

13 तास ago