क्राईम

लग्नाच्या मिरवणूकीत कोयता घेऊन लपल्याची माहिती पोलिसांनी समजली अन्…

शिक्रापूर (शेरखान सेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे रात्रीच्या वेळी सुरु असलेल्या एका लग्नाच्या मिरवणुकीमध्ये कोयता घेऊन लपलेला युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. श्रीराम संतोष होले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे.

कान्हूर मेसाई २६ मे रोजी रात्री एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. सदर मिरवणूक दरम्यान एक युवक लोखंडी कोयता घेऊन लपला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय चौधर, पोलिस शिपाई राहुल वाघमोडे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक संशयित युवक पोलिसांना दिसला. मात्र पोलिस आल्याचे कळताच तो पळून जाऊ लागला. यावेळी पोलिसांनी त्यांना पकडत अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक कोयता मिळून आला. पोलिसांनी सदर कोयता जप्त केला आहे.

पोलिस शिपाई राहुल वाघमोडे सुर्यकांत वाघमोडे (वय ४३ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी श्रीराम संतोष होले (वय २९ वर्षे रा. होलेवाडी ता. खेड जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

6 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

6 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

6 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

6 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

6 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

9 तास ago