क्राईम

शिरूर पोलिसांची चरस व गांजा अंमली पदार्थ विक्री करणा-यांवर कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गांजा विक्री जोरदाररीत्या सुरु असल्याची वास्तववादी बातमी www.shirurtaluka.com ने मांडली होती. अनेक तरुण तरुणी या व्यसनाला बळी पडत असल्याचे वास्तव माडंले होते. शिरूर पोलिसांनी दोन ठिकाणी धडक कारवाई करत गांजा व चरस हे १, २७, व ०००रु. अमली पदार्थ जप्त केले आहे.

शिरूर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावामध्ये विमल काशीनाथ पवार या महिलेच्या घरी पोलिसांनी एक पथक तयार करून तिच्या घरी अचानक छापा टाकला. तिच्या ताब्यात १०० ग्रॅम वजनाचा गांजा किमंत रु. १०००/- रू. चा माल विक्री करीता जवळ बाळगलेला असताना मिळून आला. त्याबाबत शिरूर पोलिस ठाणे गु.र.नं. ३२२/२३ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २०, २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्यामध्ये तीला अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने ता. ०६ मे रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.

अटके दरम्यान सदर महिलेकडे अधिक तपास केला असता तिने तो माल बाळासो सर्जीराव गवळी (रा. हातवळण ता. दौंड जि. पुणे) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पंच बोलावून सरकारी वाहनाने आरोपीत महिला, पंच व पोलिस स्टाफ असे हातवळण येथे जावून बाळासो सर्जीराव गवळी यास ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरामध्ये ३०० ग्रॅम वजनाचा चरस नावाचा अंमली पदार्थ किं.अं. १,२०,००० /- रू व ६०० ग्रॅम वजनाचा गांजा किं.अं.६,०००/-रु. असा गांजा व चरस नावाचा अमली पदार्थ घरझडती मध्ये मिळून आला आहे.

सदर आरोपी बाळासो सर्जेराव गवळी (वय ६२ वर्षे रा. हातवळण ता. दौंड जि. पुणे) यास सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्याने चरस व गांजा कोणा कडुन आणला याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. वरील दोन्ही आरोपींकडून अद्यापपर्यंत ७०० ग्रॅम वजनाचा गांजा व ३०० ग्रॅम वजनाचे चरस असा एकूण १,२७,०००/- रु. किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून सदर गुन्हयाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले या करत आहेत.

नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, अशा प्रकारे आपल्या परिसरात कोणी अंमली पदार्थाची विक्री, साठवण किंवा वाहतूक करत असतील तर त्याबाबतची माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मो.नं. ९८२३१०८४५२ यावर कळवावी. बातमी देणा-याचे नाव गुपीत ठेवण्यात येईल.

संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधिक्षक मितेश गटटे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर यशवंत गवारी यांचे मागदर्शना खाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पो.स.ई. स्नेहल चरापले, सहा. फौजदार रमेश कदम, पोहवा नितीन सुद्रिक, पो.ना. नाथसाहेब जगताप, पो.ना. विनोद मोरे, पो. अं. रघुनाथ हाळनोर, पो.अ . सचिन भोई या पथकाने केलेली आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, पिंपरखेड, जांबूत, टाकळी हाजी, काठापूर, रामलिंग, कारेगाव, ढोक सांगवी, पाबळ, मलठण, रांजणगाव, शिक्रापूर या परिसरात गांजा व इतर अंमली पदार्थाची जोरदार विक्री होत असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

4 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

11 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

11 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

11 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

11 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

12 तास ago