क्राईम

पैशांच्या वादातून मुलाने आईची हत्या; मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला

अहमदनगर: शहरातील सावेडी उपनगरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. पैशांच्या किरकोळ वादातून ३३ वर्षीय मुलाने स्वतःच्या आईची अडकित्त्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी मृत आईच्या देहाशेजारी शांतपणे गोट्या खेळत बसल्याचे समोर आले आहे.

पैशांवरून वाद, अडकित्त्याने डोक्यात वार

ही घटना नवलेनगर परिसरातील गजानन मंदिरासमोरील भाड्याच्या खोलीत घडली. बेबी सुधाकर गवारे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा सुहास सुधाकर गवारे (वय ३३) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुहास हा वारंवार आईकडे पैशांची मागणी करत होता. मंगळवारी दुपारी पैशांवरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सुहासने आईला बेडरूममध्ये डांबून ठेवले आणि कैऱ्या कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अडकित्त्याने तिच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या बेबी गवारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मृतदेहाशेजारी बसून गोट्या खेळत राहिला

घटनेनंतर आरोपीने दरवाजाला आतून खाट आणि धान्याच्या कोठ्या लावून घेतल्या. आईचा मृतदेह शेजारी असतानाच तो पलंगावर बसून गोट्या खेळत होता. हातातील कात्री, अडकित्ता आणि गोट्या खिडकीतून पोलिसांना दाखवत तो स्वतःशीच बडबड करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोलिसांनी दरवाजा तोडून घेतला ताबा

परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ तोफखाना पोलिस ठाणे येथे माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्धा तास आरोपीची समजूत काढल्यानंतरही तो दरवाजा उघडण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बहिणीची फिर्याद; खुनाचा गुन्हा दाखल

गवारे कुटुंब मूळचे कोपरगाव तालुक्यातील असून, पतीच्या निधनानंतर बेबी गवारे या मुलासह सावेडीत राहत होत्या. त्या घरकाम करून उदरनिर्वाह करत होत्या. मयत महिलेची मुलगी सुवर्णा दिगंबर घुले यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार सुहास गवारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिक स्थितीचा तपास सुरू

चौकशीदरम्यान आरोपीने “माझ्याकडून चूक झाली” अशी कबुली दिली. मात्र त्याचे वर्तन संशयास्पद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तो मानसिक आजाराने ग्रस्त आहे की नशेच्या प्रभावाखाली होता, याचा तपास सुरू असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

घटना उघड होताच गुलमोहोर रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. पैशांसाठी मुलाने आईचा जीव घेतल्याच्या या घटनेने शहरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. समाजमन सुन्न करणारी ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

5 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

5 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

6 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

11 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

11 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

11 तास ago