क्राईम

शिक्रापुरात पहाटे चोरी करणाऱ्यास युवकाने रंगेहात पकडले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी मध्ये घराच्या बाहेरील धान्याचे पोते चोरून घेऊन जाणाऱ्यास सदर ठिकाणच्या नागरिकांनी शिताफीने पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले असून भूपेंद्र मुन्ना ठाकूर असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील लालासाहेब मोरे हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने मोरे हे उठून घराबाहेर आले असतान एक युवक त्यांच्या घराबाहेरुन धान्याचे पोते घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले त्यावेळी मोरे यांनी सदर युवकास पकडले असता दोघांची झटापट झाली यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे नागरिक जागे झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस नाईक रोहिदास पाखरे यांनी सदर युवकाला ताब्यात घेतले.

याबाबत लालासाहेब शंकर मोरे (वय ४०) रा. इंद्रप्रस्थ कॉलनी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी भूपेंद्र मुन्ना ठाकूर सध्या रा. शिक्रापूर तळेगाव रोड (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. रसायन ठाणा महाराजपूर ता. देवरी जि. सागड याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 मिनिटे ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

7 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago