शिक्रापूर (शेरखान शेख): भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या नेहमीच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना बळ देत असल्याचे बोलले जात असताना नुकतेच त्यांनी शिरुर तालुक्यातील एका कार्यकर्त्याच्या दुकानात अचानक भेट देत त्यांची विचारपूस करत त्यांना बळ देण्याचे काम केले असल्याचे दिसून आले आहे.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांच्या तळेगाव ढमढेरे येथील दुकानात अचानक भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नुकतीच अचानक भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, ज्योती भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भुजबळ, महेंद्र गजरे, विशाल कऱ्हेकर यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान चित्रा वाघ यांनी नवनाथ भुजबळ यांनी केलेल्या सामाजिक कामांचा आढावा घेत व्यवसायाची देखील माहिती घेतली तर राजकारण व समाज कारण करत असताना व्यवसाय देखील सांभाळला पहिले असा सल्ला देत नवनाथ भुजबळ यांचे कौतुक करत पक्षांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देखील दिले. यावेळी चित्रा वाघ यांचा उपस्थितांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…