Crime
शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथील शेतकरी किरण शितोळे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती. (दि. ११) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले होते. दोन दिवसांनी पुन्हा शितोळे हे शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी मोटारची दोरी व पाईप कापून विहिरीतील मोटार व विद्युत केबलची चोरी केल्याचे गायकवाड यांच्या निदर्शनास आले.
याबाबत किरण शिवाजी शितोळे (वय ३१) रा. शिरसगाव काटा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संपत खबाले हे करत आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…