Crime
शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील फिनिक्स सोसायटी येथे राहणाऱ्या रुपाली टाक या ७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रुपाली या घरी आल्या असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाट उघडे व साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत रुपाली सतीष टाक (वय ३२) रा. फिनिक्स सोसायटी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. हिरापूर ता. गेवराई जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…