क्राईम

हिंदू धर्मातील नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक

 

येशूलाच देव माना इतर कुठलेही देव नाहीत

पुणे: पुण्यातील पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. येशूला देव माना इतर कुठलेही देव नाहीत. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख, समृद्धी लाभेल असे म्हणून पिंपरी कॅम्प येथे धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हिंदू धर्मातील नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफर जाविन जेकॉब, स्टीव्हन विजय कदम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. यांच्यासह 16 वर्षीय बालकाचा यात समावेश आहे. नोटीस देऊन पिंपरी पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे. पिंपरी कॅम्पमध्ये अमेरिकन नागरिक असलेल्या शेफर जेकॉब आणि स्टीव्हन कदम हा हिंदू धर्मातील नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. नागरिकांच्या घराबाहेर जाऊन त्यांना आवाज देऊन येशू विषयी माहिती दिली जात होती.

नागरिकांना पैशांच देखील अमीष दाखवलं

ख्रिश्चन धर्म किती श्रेष्ठ आहे, हे सांगितलं जातं होत. ख्रिश्चन धर्म वगळता कुठलाच धर्म महत्वाचा नाही. या विश्वासात केवळ येशूच आहे. इतर धर्म केवळ कथा आहेत. इतर देवतांना न मानता तुम्ही येशूला माना असे सांगून नागरिकांना धर्मांतर करण्याचा प्रयत्न अमेरिकन नागरिक आणि भारतीय नागरिक असलेला स्थिव्हन कदम करत होता. ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन केल्यास तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य लाभेल. अस नागरिकांना पटवून दिले जात होत. पैशांचा देखील अमीष दाखवलं जात होतं. अखेर याप्रकरणी काही सजग नागरिकांनी थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पिंपरी पोलिसांनी तात्काळ अमेरिकन नागरिक आणि भारतीय नागरिकाला अटक केली आहे. अमेरिकन नागरिक शेफर जेकॉब हा एक वर्षाच्या मुदतीवर भारतात आलेला आहे.

येशूलाच देव माना, दुसरा कोणताही देव नाही असं सांगून धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न

पिंपरी कॅम्पमध्ये अमेरिकन नागरिक असलेल्या शेफर जेकॉब आणि स्टीव्हन कदम हा हिंदू धर्मातील नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. येशूलाच देव माना, दुसरा कोणताही देव नसल्याची माहिती हे दोघे नागरिकांना देत होते. ख्रिश्चन धर्मात सुख, समृद्धी लाभेल असे म्हणून पिंपरी कॅम्प येथील नागरिकांचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

10 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago