क्राईम

पोलीस स्टेशनमध्येच 3 तरुणांचा अनैसर्गिक लैंगिक छळ; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणासंदर्भात चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलेल्या तीन तरुणांना पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याने अमानुष मारहाण करत कपडे काढून परस्परांशी अनैसर्गिक लैंगिक चाळे करण्यास भाग पाडले आणि त्यांचा अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणांनी केला आहे. या गंभीर आरोपांनंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

नेमका प्रकार काय घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांनी तीन तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. आरोपानुसार, नाऱ्हेडा यांनी या तरुणांना कपडे काढायला लावले, त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर परस्परांशी अनैसर्गिक लैंगिक चाळे करण्यास भाग पाडले. हा प्रकार अतिशय गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पाऊल उचलत पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस अधिकाऱ्याच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.

या घटनेनंतर विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, केवळ निलंबनावर न थांबता, सदर पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा पार्श्वभूमीवर, त्यांच्याकडून पुन्हा अशा प्रकारचा गैरवर्तन झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

10 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago