क्राईम

दोन नराधामांचा नववीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संतापजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीवर मागील ६ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन कन्नड शहर पोलीस ठाण्या तदोन आरोपीविरुद्ध 26 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे अशी आरोपींचे नावं असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, कन्नड शहराजवळच्या एका गावात एक अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपी रामेश्वर कवडे याने तिच्या घरात प्रवेश करुन तिच्यावर अत्याचार करून याबाबत कोणाला सांगितल्यास तुझी बदनामी करेन, तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच आरोपीने वारंवार बलात्कार केला. ही बाब दुसरा आरोपी मोहन शिंदे याच्या निदर्शनास आली. त्यानेही पीडितेला आपल्यासोबतही शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझ्या आई-वडिलांना सांगतो, असे म्हणत अत्याचार केला.

पण वारंवार अत्याचार सहन न झाल्याने याबाबत चार दिवसांपूर्वी पीडितेने आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कन्नड शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्यावर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पिंक पथकाचे पोउपनि राम बारहाते करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago