शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरील शिक्रापूर पाबळ रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण घडत असताना नुकतेच दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिलिंद नामदेव मंचरे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ शिक्रापूर रस्त्यावरुन शहाजी चव्हाण (दि. २८) नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पाबळ बाजूने त्यांच्या ताब्यातील एम एच १२ यु एम ३६९१ हा टेम्पो घेऊन येत असताना शिक्रापूर बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ एफ एम २१५१ या क्रुझर जीपची चव्हाण यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली आणि दोन्ही वाहने रस्त्याचे दोन्ही बाजूला चरित गेली. या अपघातात टेम्पो चालक शहाजी चव्हाण हे गंभीर जखमी होत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत शहाजी श्रीरंग चव्हाण (वय ४४) रा. जेल रोड येरवडा पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी मिलिंद नामदेव मंचरे रा. नागापूर पोस्ट रांजणी ता. आंबेगाव जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…