मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील शिंदेवाडी येथे रविवार (दि २८) रोजी खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे या स्थानिक नागरीकांमध्ये पुर्वीच्या हाणामारीच्या वादातुन अचानक भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. बैलगाडा घाटात झालेल्या मारहाणीत संजय रखमा शिंदे (वय अंदाजे ३५) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री १० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

 

शिंदेवाडी येथील स्थानिक भाविकीतील दोन कुटुंबात ही वादावादी झाली. त्यामुळे बैलगाडा शर्यती तातडीने बंद करण्यात आल्या. पुर्वीच्या हाणामारीच्या वादातुन त्यांच्यात कायम शिवीगाळ होत होती. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले आहे. या खुन प्रकरणी भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे यांच्यावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून शिरुर पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

सध्या बेट भागात गावोगावी यात्रा-जत्रा सुरू असून बैलगाडा शर्यत, तमाशा हे यात्रेचे मुख्य आकर्षण बनले आहे. बंद झालेल्या शर्यती सुरु झाल्यापासुन बैलगाडा प्रेमी प्रत्येक यात्रेतील शर्यतीत सहभाग नोंदवत आहेत. बेट भागातील टाकळी हाजी येथील कुडांवर सर्वात मोठी यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवसावर आली असून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

 

ग्रामीण भागात यात्रे दरम्यान किरकोळ वादावरुन राग मनात ठेवून हाणामारी होत आहे. अशा प्रकारे तंटे, हाणामारी झाल्यास यात्रा बंद होऊ शकते. त्याठिकाणी पुन्हा बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळत नाही. तसेच संवेदनशील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरीकांमधुन होत आहे.

शिंदेवाडी येथे बैलगाडा प्रेमींची निराशा;भांडण झाल्याने शर्यती अर्ध्यातच बंद; एकजण गंभीर जखमी

तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी

भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी

शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago