क्राईम

गर्भाशयातील गाठी काढण्याच्या नावाखाली गर्भाशयच काढले; पुण्यात त्या हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा

पुणे: गर्भाशयातील गाठ काढण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशयच काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात साई केअर हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांसह पाच जणांविरुद्ध शस्त्रक्रियेत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साई केअर हॉस्पिटलचे डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्यावर भारतीय न्याय दंड संहिता कलम १२५ (ब), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने हडपसरमधील मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने २०२३ मध्ये सोनोग्राफी केली असता गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे निदर्शनास आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना १३ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरी येथील साई केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सोनोग्राफी अहवालाच्या आधारे डॉक्टरांनी गाठ लेझर शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागेल, असे सांगितले. १४ सप्टेंबर रोजी त्या रुग्णालयात दाखल झाल्या आणि १५ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुन्हा तपासणीत उघड झाला प्रकार

डिस्चार्जनंतर महिलेची तब्येत बिघडू लागल्याने त्या पुन्हा तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या. त्यावेळी त्यांच्या गर्भाशय काढण्यात आल्याचे समोर आले. वैद्यकीय कागदपत्रांतही त्याचा उल्लेख असल्याचे समजते.

महिलेने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांनी केवळ गर्भाशयातील गाठ काढण्यास संमती दिली होती; गर्भाशय पूर्णपणे काढण्यास त्यांनी परवानगी दिली नव्हती. या बाबत डॉक्टरांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

पोलिसांची कारवाई

मांजरी पोलिसांनी रुग्णालयातील कागदपत्रे, संमतीपत्र आणि शस्त्रक्रियेचा अहवाल तपासला. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचे मत घेतल्यानंतर संबंधितांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

11 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

12 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

17 तास ago