क्राईम

सरदवाडीतून वॅगनर कार चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल..

शिरूर तालुक्यात गाड्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले..

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून घरासमोरून उभी ठेवलेली वॅगनर कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत टु व्हिलर, फोर व्हीलर गाड्या चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले असून शिरूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी सरदवाडी येथील रहिवासी बाळासाहेब शंकर गोरडे (वय ३४ वर्षे ) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक ८ जुलै रोजी रात्री १० वाजता त्यांनी स्वतःची सिल्व्हर रंगाची वॅगनर कार (MH-02-AK-2675) ही पुणे-हायवेच्या कडेला, स्वतःच्या घरासमोर पार्क करून ठेवली होती. मात्र दुसऱ्या दिवशी ९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता त्यांनी गाडी तपासली असता ती जागेवरून गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून चोरट्याचा माग काढण्यासाठी विविध पथकांद्वारे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, शिरूर परिसरात मागील काही दिवसांत वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण काही नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे स्थानिकांनी आपली वाहने सुरक्षित स्थळी पार्क करावीत तसेच शंकेस्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago