मुख्य बातम्या

कलाकेंद्रावरील कथित गोळीबार प्रकरण; गोळीबाराच्या घटनेचा राजकीय हेतूने गैरवापर, शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): आमदार माऊली कटके यांच्यावर समाजमाध्यमांद्वारे करण्यात आलेल्या बदनामी विरोधात शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत कायदेशीर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणाशी त्यांचा काही संबध नसताना त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर काही ठिकाणांहून व्हायरल करण्यात आला होता. आमदार रोहित पवार यांनीही याबद्दल टीपण्णी केली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविकांत वर्पे यांच्या नावे पोस्ट व्हायरल करून आमदार कटके व त्यांच्या भावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे या पोस्टमध्ये म्हटले होते.

काही समाज माध्यमांवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट शिरूर पोलिस ठाणे गाठून आमदार कटके यांची बदनामी करणारांचा तीव्र शब्दांत निषेध केला. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन देऊन आमदारांची बदनामी करणारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची व त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शहर अध्यक्ष शरद कालेवार, युवकचे शहर अध्यक्ष एजाज बागवान, क्रिडा विभागाचे शहर अध्यक्ष अतुल गव्हाणे, कुंडलिक शितोळे, रंजन झांबरे, सुनिल जाधव, स्वप्नील रेड्डी, रोहित पटवा, प्रवीण जामदार, अतुल जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, आमदार कटके यांच्या बदनामीच्या प्रकाराचा श्रीराम सेनेसह तालुक्यातील विविध संस्था, संघटनांनीही निषेध नोंदविला आहे. आमदार कटके हे जीव ओतून तालुक्याच्या विकासासाठी झटत असताना त्यांच्या विकासाच्या वाटेत अडथळे आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप श्रीराम सेनेचे संस्थापक सुनील जाधव यांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

2 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

2 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

2 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

18 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

18 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

19 तास ago