क्राईम

पुणे नगर महामार्गावर प्रवासी महिलेचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन अहमदनगर ते पुणे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा अज्ञात व्यक्तीकडून एस टी बसमध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार घडला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन प्रवास करताना अहमदनगर येथून एम एच ४० एन ९३५० या एसटी मधून सदर प्रवासी महिला प्रवास करत होती, सदर मार्गावर महिलेच्या पाठीमागील शिटवर बसलेल्या इसमाने महिलेच्या शरीराला स्पर्श करत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले त्यानंतर शिक्रापूर येथे आल्यानंतरही पुन्हा तोच प्रकार घडल्याने महिलेने एसटी वाहकाला हा प्रकार सांगून शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर एसटी थांबवली. यावेळी महिलेसह काही व्यक्ती व वाहक हे पोलीस स्टेशनमध्ये जात असताना विनयभंग करणारा व्यक्ती पळून गेला.

याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार नवनाथ नाईकडे हे करत आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago