मुख्य बातम्या

ग्राहकांनो सावधान! केव्हाही रिकामे होईल आपले बँक खाते

शिरुर (अरुणकुमार मोटे): अनेकदा आपणांस एसएमएस आणि बनावट (फ्रॉड) फोन कॉलच्या माध्यमातून खोटे संदेश, विविध लिंक आणि फोन येत असतात. या फोनला जर प्रत्युत्तर कराल तर आपले बँक खाते क्षणार्धात खाली होऊ शकते. अशा अनेक घटना या आधीच्या काळातही घडल्याचे दिसून आले आहे. अशाच प्रकारे चक्क रविवारच्या सुट्टीच्या दिवशी काही ग्राहकांना महाराष्ट्र बँक मधून बोलतोय अशा प्रकारचे टाकळीहाजी, शिरुर परीससरात फोन येत विविध प्रश्नांच्या बाबतीत विचारणा करत माहिती मागवण्यात येत होती. यामध्ये समोरील व्यक्ती हिंदी भाषेतून बोलत मी महाराष्ट्र बँकेतून बोलतोय, आपल्या खात्याची केवायसी करण्यासाठी आम्हास आपले आधार क्रमांक, पॅन क्रमांक याबद्दल माहिती हवी आहे.

तसेच आपल्या खात्यास आधार लिंक नाही. आपला मोबाईल नंबर खात्यास दिसत नाही. आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी पासवर्ड आम्हास सांगावा अशा प्रकारे बनावट फोन आल्याने अनेक ग्राहकांचा गोंधळ उडाला. अशा प्रकारे फोन आल्यास अनेकजणांना हे फोन संशयास्पद वाटल्याने त्यांनी सावधानता बाळगली. पण सर्वच लोकांना संबंधित कॉल, लिंक, मेसेजेस खोटे अथवा बनावट आहे हे कळेलच असे नाही. तसेच या बाबतीत विचारणा करण्यासाठी बँक केव्हाही आपल्या ग्राहकांना संपर्क करत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या बनावट कॉल ला कोणताही प्रतिसाद न देता थेट आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन संपर्क साधणे गरजेचे आहे.

अशा संपर्कांना कोणताही प्रतिसाद देऊ नये व खात्यासंबंधी गोपनीय बाबी फोन वर कोणास सांगू नये अशा प्रकारचे संदेश देत बँक आपणास वारंवार सूचित करत असतात. यामुळे ग्राहकांनी सतर्कता बाळगून आपल्या बँक खात्याची काळजी घ्यावी आणि आपल्या नजीकच्या बँक शाखेस जाऊन भेट देत समक्ष माहिती घ्यावी. अन्यथा आपले बँक खाते रिकामे होऊन मोठे नुकसान होऊ शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

10 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

10 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

11 तास ago