पुणे: कोथरुड परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून २३ वर्षीय तरुणाची प्रेयसीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच महिलांसह एका पुरुषाला अटक केली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव (वय २३) हा शिवाजीनगरमधील वडारवाडी परिसरातील रहिवासी होता. शनिवारी (दि. १४) सायंकाळी त्याला प्रेयसीच्या मोबाईलवरून मेसेज आणि फोन करून कोथरुडमधील एसएनडीटी महाविद्यालयाजवळील मेगासिटी परिसरात भेटण्यासाठी बोलावण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्याची माहिती असूनही नागेश विश्वास ठेवून फुलांचा गुच्छ घेऊन भेटायला गेला.
मात्र तेथे पोहोचताच मुलीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्याला इमारतीच्या टेरेसवर नेऊन लाकडी काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत नागेश गंभीर जखमी झाला.
आईला फोन करून धमकी
घटनेनंतर नागेशच्या मोबाईलवरून त्याच्या आई सुरेखा जाधव यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शिवीगाळ करत “तुझा मुलगा मेगासिटीमध्ये आहे, आम्ही त्याला मारून टाकले आहे. दहा मिनिटांत येऊन घेऊन जा,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपचारादरम्यान मृत्यू
नागेशला गंभीर अवस्थेत रत्ना रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांचा आक्रोश
नागेशची मोठी बहीण रवीना पाटील म्हणाल्या, “नागेशला प्रेयसीच्या वडिलांनी भेटायला बोलावले होते. ‘पाच मिनिटांत येतो’ असे सांगून तो घराबाहेर पडला. पण त्याला जिन्यात पकडून टेरेसवर नेण्यात आले आणि १० ते १५ जणांनी निर्दयपणे मारहाण केली.”
कुटुंबाची जबाबदारी नागेशवर
नागेशने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते आणि शिवाजीनगरमधील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात मदतनीस म्हणून काम करत होता. पाच वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर तोच कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता.
सहा आरोपी अटकेत
या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात वृषाली अनिल शिंदे, सुनीता सुनील शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, तुळशी योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनील शिंदे, पोपट शिंदे, योगेश शिंदे आणि अनिल शिंदे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एक पुरुष आणि पाच महिलांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…