शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे भाड्याने दिलेल्या जागेच्या पैशाच्या झालेल्या वादातून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रवीण उर्फ बारक्या बबन दरेकर, बंटी जाधव, कुणाल उर्फ बंटी कैलास दरेकर, केतन गोरख दरेकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील अतिश दरेकर यांच्या आईच्या नावे असेलेली जागा प्रवीण दरेकर याला भाड्याने दिलेली असताना सदर जागेचे भाडे न मिळाल्याने आतिश दरेकर व प्रवीण दरेकर यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली होती, त्यांनतर सायंकाळच्या सुमारास आतिश सणसवाडी येथे असताना बंटी जाधव, कुणाल दरेकर, केतन दरेकर सदर ठिकाणी आले आणि आतिशला शिवीगाळ दमदाटी करत सकाळी प्रवीणला काय बोलला, प्रवीण ने आम्हाला तुझा कार्यक्रम करायला पाठवले असे हाताने मारहाण केली दरम्यान बंटी जाधव याने लोखंडी रॉडने आतिशच्या डोक्यात मारहाण करुन जखमी केले.
सदर घटनेत आतिश सुखदेव दरेकर हा जखमी झाला असून याबाबत अतिश सुखदेव दरेकर (वय २८) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रवीण उर्फ बारक्या बबन दरेकर, बंटी जाधव, कुणाल उर्फ बंटी कैलास दरेकर, केतन गोरख दरेकर सर्व रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कृष्णा व्यवहारे हे करत आहे.
अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…
1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा…
मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…
वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…