क्राईम

पिंपळे जगतापला किरकोळ वादातून दोघांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप ता. शिरुर येथे महिलेला केलेल्या शिवीगाळ चा जाब विचारल्याने महिलेच्या दाजी व भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल अरुण चंदनशिव, विजय राजू चंदनशिव, प्रल्हाद नानाभाऊ चंदनशिव, अरुण नानाभाऊ चंदनशिव, पवन प्रल्हाद चंदनशिव, नानाभाऊ उमाजी चंदनशिव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील प्रियांका लोखंडे हि महिला घरासमोर काम करत असताना त्यांच्या समोरील अरुण चंदनशिव या सदर महिलेकडे पाहीन शिवीगाळ करत होता. दरम्यान महिलेने त्यालाजाब विचारला असता त्याने महिलेला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

यावेळी महिलेचे दाजी लक्ष्मण पाटोळे व भाऊ रोहित जाधव दोघांनी अरुण याला बाजूला केले असता त्यांच्यात वाद झाला. दरम्यान अरुण याच्या घरातील लोकांनी लक्ष्मण पाटोळे व रोहित जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गज व काठीने मारहाण केली असता लक्ष्मण भारत पाटोळे व रोहित ज्ञानेश्वर जाधव हे दोघे जखमी झाले.

याबाबत प्रियांका कैलास लोखंडे (वय २८) रा. पिंपळे जगताप (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी राहुल अरुण चंदनशिव, विजय राजू चंदनशिव, प्रल्हाद नानाभाऊ चंदनशिव, अरुण नानाभाऊ चंदनशिव, पवन प्रल्हाद चंदनशिव, नानाभाऊ उमाजी चंदनशिव सर्व रा. पिंपळे जगताप (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago