मनोरंजन

78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपटाना सहभागी होण्याची सुवर्णसंधी

१८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन 

मुंबई: फ्रान्स येथे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका मागविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना यासाठी प्रवेशिका सादर करता येणार असून या प्रवेशिका अर्ज filmcitymumbai.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त निर्मात्यांनी प्रवेशिका अर्ज भरण्याचे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.

मराठी चित्रपटांना जागतिक चित्रपट बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी २०१६ पासून महामंडळ कान महोत्सवात सहभागी होत आहेत. यंदाही सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी 18 फेब्रुवारी पर्यंत दिलेला अर्ज भरून cfffm2025@gmail.com या मेल आयडीवर मेल करायचा आहे. अधिक माहिती आणि नियम www.filmcitymumbai.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कान्स’मध्ये सहभागी होण्याचा विचार करताय? मग ‘या’ अटी वाचाच

कान्स आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 फिल्म बाजारमध्ये सहभागी होण्यासाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येईल. निर्माते / निर्मिती संस्थांनी त्यांचे अर्ज cftim2025@gmail.com या ई-मेल वर सादर करावेत. इतर भाषेतील रिमेक, डब असलेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येणार नाही.

ज्या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजार 2024 करिता महामंडळामार्फत निवड करण्यात आली होती अशा चित्रपटांना सहभागी होता येणार नाही

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

10 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

11 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

14 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

15 तास ago