मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडसह मराठी आणि हिंदी कलाविश्वात अनेक कलाकारांकडून गुडन्यूज समोर येत आहेत. अशातच आता टेलिव्हिजन विश्वातूनही एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती हिने चाहत्यांसोबत आई होणार असल्याची गोड बातमी शेअर केली आहे.
लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी सुरभीने तिच्या गरोदरपणाची घोषणा सोशल मीडियावर केली. ११ फेब्रुवारी रोजी तिने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये एका बाजूला पती सुमित सूरीचे पाय, दुसऱ्या बाजूला सुरभीचे पाय आणि मधोमध छोट्या बाळाचे बूट ठेवलेले दिसत आहेत. या साध्या पण भावनिक फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फोटो शेअर करत सुरभीने कॅप्शनमध्ये सर्वप्रथम “ॐ” असे लिहित पुढे म्हटले, “आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर प्रवास आता सुरू होणार आहे. आमचं बाळ यंदा जूनमध्ये या जगात येणार आहे.”
ही पोस्ट शेअर होताच चाहत्यांसह सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मौनी रॉय, अनीता हसनंदानी, कृष्णा मुखर्जी, पंजाबी गायिका सिमर कौर, श्वेता तिवारी, आरती एस. चौहान यांसारख्या कलाकारांनी कमेंट्समधून अभिनंदन केले आहे.
दरम्यान, काही काळापासून सुरभी सोशल मीडियावर सक्रिय नसल्याने चाहते तिची चौकशी करत होते. आता या आनंदाच्या बातमीमुळे तिच्या अनुपस्थितीमागचे कारणही स्पष्ट झाले आहे.
सुरभी ज्योतीने ‘कुबूल है’, ‘नागिन’, ‘गुनाह’, ‘कोई लौट के आया है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले असून काही वेब सीरिज आणि चित्रपटांमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा पती सुमित सूरी हाही अभिनेता असून त्याने ‘वॉर्निंग’, ‘व्हॉट द फिश’, ‘बबलू हॅप्पी है’, ‘१४ फेरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच ‘द टेस्ट केस’ आणि ‘होम’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
सुरभी आणि सुमितच्या आयुष्यात आता नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. जून महिन्यात त्यांच्या घरी येणाऱ्या या गोड पाहुण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…
हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…
विजय वडेट्टीवारांचा घणाघात; जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक…
जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून…
अनेक जणांच्या डोक्यामध्ये नेहमीच खूप कोंडा असतो. हिवाळ्यात कोंड्याचे प्रमाण वाढते हे सहाजिक आहे. पण…