मनोरंजन

झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार भावनिक घडामोडींचा आठवडा; गुरुकुलवर वाडेकरांचा डाव, आनंदीचा परदेशवारीचा निर्णय!

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक रंजक, भावनिक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरुकुलच्या नव्या जागेवर वाडेकरांची खेळी रंगणार आहे, तर ‘लक्ष्मी निवास’मध्ये आनंदीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या निर्णयामुळे कुटुंबात वादळ निर्माण होणार आहे. ‘धाकट्या सुनबाई’मध्ये राधिका-वेदांतची जवळीक वाढणार असून, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्येही नाट्यमय वळणे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मालिकाप्रेमींसाठी हा आठवडा मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

गुरुकुलच्या नव्या जागेवर वाडेकरांची मोठी खेळी!

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत बालदिनानिमित्त अबीर आणि ओवी गुरुकुलमधील मुलांसोबत आनंदाने दिवस साजरा करतात. याचदरम्यान सावली गुरुकुलसाठी नवीन जागा मिळवण्यात यशस्वी होते. मात्र, नव्या जागेवरील गुरुकुलच्या पहिल्याच दिवशी वाडेकर मोठी खेळी खेळतात. गुरुकुलचा नवा मालक असल्याची घोषणा करून ते सर्वांना धक्का देतात. वाडेकरांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे गुरुकुलसमोर कोणते नवे संकट उभे राहणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आनंदीच्या परदेशवारीच्या निर्णयाने ‘लक्ष्मी निवास’मध्ये कौटुंबिक वादळ!

‘लक्ष्मी निवास’मध्ये नात्यांचे नवे पदर उलगडणार आहेत. रमा पहिल्यांदाच सिद्धूला ‘बाबा’ म्हणून हाक मारते. दुसरीकडे जयंत जान्हवीला न सांगता गुपचूप जानूची भेट घेतो. पाडव्याला जान्हवी आणि भाऊबीजेला लक्ष्मी, अशा दोघींकडून दिग्विजयचे औक्षण केले जाणार आहे. दरम्यान, आनंदी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करते. मात्र, सिद्धू आणि भावना तिच्या निर्णयाला विरोध करतात. त्यामुळे नाराज झालेली आनंदी घर सोडून लक्ष्मीकडे राहायला जाते. तिच्या या निर्णयामुळे सिद्धू आणि भावना यांच्यात मोठा वाद होणार असून, कुटुंबातील नात्यांमध्ये कोणते नवे वळण येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राधिका-वेदांतच्या नात्यात फुलणार प्रेमाचे सूर!

‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत पाणीदानाचा ट्रॅक निर्णायक वळणावर पोहोचला आहे. गावकऱ्यांचा पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि टँकरवरून निर्माण झालेला वाद यामुळे गावातील वातावरण तापले आहे. या तणावपूर्ण वातावरणात राधिका आणि वेदांत यांच्यातील प्रेमळ, भावनिक आणि खट्याळ क्षणही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. पाडव्याच्या निमित्ताने वेदांतच्या प्रोत्साहनामुळे राधिका पहिल्यांदाच सर्वांसमोर बासरी वाजवणार आहे. तर दुसरीकडे गोदाक्का राधिकाच्या लग्नाची जुळवाजुळव सुरू करणार आहे. त्यामुळे राधिकाच्या आयुष्यात कोणते नवे वळण येते, याकडे लक्ष लागले आहे.

कृष्णाईच्या लेकींकडून आईला अनोखी ओवाळणी!

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत कृष्णाई घरी परतल्यानंतर तिला लक्ष्मीपूजन करण्याचा आग्रह केला जातो. पूजेदरम्यान अशक्तपणामुळे तिचे हात थरथरू लागतात. अशा वेळी शंकर आणि गौरी तिचे हात घट्ट धरून तिला आधार देतात. दुसरीकडे गौरीला फराळ घेऊन मातोश्रींच्या घरी पाठवले जाते. जिगीषाच्या सांगण्यावरून गौरीच्या पायांचे ठसे मातोश्रींच्या घरात उमटतात. भाऊबीजेच्या निमित्ताने इंदुराणी आपल्या पतीला कृष्णाईच्या दारात घेऊन येते आणि त्याचे औक्षण करते. यावेळी तिन्ही मुली आपल्या आईला पदव्या आणि आयुष्यात मिळवलेल्या यशाच्या रूपात अनोखी ओवाळणी देतात. आई-मुलींच्या नात्यातील हा भावनिक सोहळा प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे.

‘कमळी’मध्ये फॅमिली बोर्ड मीटिंग; ऋषी-कमळीच्या जवळिकीने नयनतारा अस्वस्थ!

‘कमळी’ मालिकेत अन्नपूर्णा आजी घरात फॅमिली बोर्ड मीटिंग बोलावते. त्यामुळे घरात उत्सुकतेसोबतच तणावाचे वातावरण निर्माण होते. दुसरीकडे ऋषी बंडखोर वृत्तीने कमळीसोबत कॉलेजच्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात करतो. या निमित्ताने दोघांमधील जवळीक वाढू लागते. मात्र, ऋषी आणि कमळीला एकत्र पाहून नयनताराला मोठा धक्का बसतो. तिच्या मनात नाराजी आणि गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे या तिघांच्या नात्यांमध्ये कोणते नवे भावनिक वळण येणार, याची उत्सुकता वाढली आहे.

‘तारिणी’समोर ओलीस ठेवलेल्या मुलांच्या सुटकेचे मोठे आव्हान!

‘तारिणी’ मालिकेत भाऊबीजेच्या दिवशी मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. युवराज कौशिकीचा अपमान करतो; मात्र केदारला हे सहन होत नाही आणि तो युवराजच्या कानाखाली लगावतो. दिवाळीनंतर कव्याच्या साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच तारिणीसमोर नवे आव्हान उभे ठाकते. शाळेच्या बसमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांची सुखरूप सुटका करण्याची महत्त्वाची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात येते. दुसरीकडे, सीईओ झालेला दयानंद याच्या परवानगीने युवराज या घटनेचे अतिरंजित वार्तांकन करतो. त्यामुळे तारिणी या संकटाचा सामना कसा करणार आणि मुलांची सुरक्षित सुटका कशी करणार, हे पाहणे थरारक ठरणार आहे.

एकूणच, गुरुकुलवरील संकट, आनंदीचा बंडखोर निर्णय, राधिका-वेदांतच्या नात्यातील नवे रंग, कमळीतील भावनिक संघर्ष आणि तारिणीसमोरील थरारक आव्हानांमुळे झी मराठीवरील हा आठवडा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जिल्हा न्यायालयांतील ३४ हजार कर्मचारी संपावर; न्याय देणाऱ्या व्यवस्थेतच न्यायाचा प्रश्न!

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमधील तब्बल ३४ हजार कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची वेळ येणे, ही…

2 तास ago

जलद गतीच्या व्यायामांमुळे रक्तातील साखर वाढू शकते?

चालणे, योगासन करणे आणि जास्त हालचालींचे बहुतेक प्रकार शरीराला ग्लुकोजचे चांगले नियमन करण्यास मदत करतात.…

4 तास ago

घरच्या घरी ब्लड प्रेशर कसे तपासावे

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत…

4 तास ago

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…

17 तास ago

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…

17 तास ago

थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

17 तास ago