मेष: एकत्रित कुटुंबात एखाद्या कारणावरुन वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. बर्याच संघर्षानंतर आज तुम्हाला समस्यांपासून थोडी सुटका मिळेल.
वृषभ: एकामागून एक कार्य पूर्ण झाल्यामुळे मनामध्ये आनंद राहील. धनलाभ होण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबात लवकरच शुभ कार्य होईल.
मिथुन: आज तुमची जलद हालचाल करण्याची वेळ आहे. तुमची अनपेक्षित प्रगती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. तुमची स्वतःची नजर तुमच्या कर्तृत्वावर देखील असू शकते. नवा व्यवसाय सुरु करण्याचा योग आहे. आरोग्य सुदृढ राहील. भावंडांसाठी रोजगाराची नवी संधी चालून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. एखाद्या नातेवाईकासोबत धार्मिकस्थळी भेट द्याल.
कर्क: आजचा दिवस शुभ आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सदैव वचनबद्ध आहात. आजही ती चिंता तुम्हाला सतावू शकते. विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी चांगला काळ सुरू आहे. नवी गाडी खरेदीचा विचार कराल. कोणताही निर्णय घाई-घाईत घेऊ नका.
सिंह: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. नोकरीत पदोन्नती होण्याचा योग आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
कन्या: आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास वाढ होईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची पूजा करा. कुटुंबात आनंदाचे वतावरण असेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
तूळ: संपत्तीत गुंतवणूक करण्याचा योग आहे. रुग्णालयात ये-जा करावी लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अधिकची जबाबदारी देण्यात येईल. पत्नीसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: व्यापारात वाढ होईल मात्र, खर्चात वाढ होण्याची चिन्ह आहेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीतून चांगला नफा होईल. नवी कार खरेदी करण्याचा विचार कराल.
धनु: नव्या व्यापाराची संधी उपलब्ध होईल. मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कराल. परदेशी नोकरीची संधी चालून येईल. वाहन खरेदी कराल. वायफळ खर्च टाळा. मित्रांसोबत बाहेर पिकनिकला जाण्याचं प्लानिंग कराल.
मकर: रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामामुळे प्रशंसा होईल आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे.
कुंभ: व्यवसायातून चांगला नफा होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अविवाहितांना लवकरच लग्नाची मागणी येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. गरीबांना अन्न दान करा.
मीन: आर्थिक स्थिती उत्तम असेल. पोटाच्या संबंधित आजाराची समस्या जाणवण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी संघर्ष करावा लागू शकतो. श्री गणेशाची पूजा करा. गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा.
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…
पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…
शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…
अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…