क्राईम

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन तब्बल २ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील कोळपेवस्ती येथे घडली आहे. गुरुवारी (ता. २९) भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्याने घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप लक्ष्मण कोळपे (वय ३५, रा. कोळपेवस्ती, मांडवगण फराटा, ता. शिरुर) यांच्या घरात दि २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:४५ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान हि चोरी झाली. चोरट्याने घर उघडे असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने चोरुन पोबारा केला.

चोरट्याने २१ ग्रॅम वजनाचे मणी असलेले सोन्याचे गंठण, अंदाजे किंमत १ लाख ६८ हजार रुपये, तसेच ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे किंमत ४० हजार रुपये, असा एकूण २ लाख ८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. घरातून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी संदीप कोळपे यांनी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…

27 मिनिटे ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…

3 तास ago

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…

3 तास ago

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

15 तास ago

हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय

पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…

15 तास ago

गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…

15 तास ago