भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ असेल. आर्थिक समस्या दूर होईल. पार्टटाइम कामासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल त्याचा लाभ घ्या. तुम्ही तुमच्या चांगल्या वर्तणुकीतून वातावरण चांगले बनवाल. पत्नीच्या तब्येतीमुळे तुम्हाला आज धावपळ करावी लागेल, तुम्हाला आज काही त्रासाला तोंड द्यावे लागू शकते.

वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला सफलता मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला दुपारपर्यंत आनंदाची बातमी मिळेल. प्रकृतीबद्दल सावध राहा, तरच तुम्हाला लाभ मिळतील. सायंकाळपर्यंत बहुप्रतीक्षित नातेवाईकांचे आगमन झाल्याने आनंद होईल पण त्याचबरोबर खर्चात थोडी वाढ होईल.

मिथुन: आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. वेळ खूप गतीने पुढे जातो आहे त्याचा लाभ घ्या. वेळेला वाया जावू देवू नका. ऑफिसमध्ये तुम्हाला यश मिळेल पण तुमचे कौतुक पाहून सहकारी तुम्हाला त्रास देवू शकतात. तुम्ही फक्त कामात फोकस करा. अनावश्यक खर्चापासून सावध राहा. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत घाईगडबड टाळा. आदरणीय व्यक्तींच्या दर्शनाने मनोबल वाढेल.

कर्क: आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. तुमची काळजी दूर होणार आहे. ऑफिसच्या कामात प्रगती असून तुम्हाला नवीन काम मिळणार आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यावर ठाम निर्णय घ्या. व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि मान, प्रतिष्ठा वाढेल. घाईगडबड किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय भविष्यात पश्चातापाचे कारण ठरतील.

सिंह: प्रत्येक कामात अडचण आहे. व्यवसायात तुमचा त्रास वाढणार आहे. पुढची ऑर्डर मिळालेली नाही त्यामुळे खर्चाची ताळमेळ कशी करावी याबद्दल तुम्ही काळजी कराल. एखाद्या नातेवाईकामुळे तणाव राहील. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा, पैसे अडकू शकतात. दिवसा कोर्टकचेरीच्या फेऱ्या होतील. अखेरीस तुमचा विजय होईल. तुमच्या विरोधातील षडयंत्र अपयशी होतील

कन्या: आजचा दिवस खूप धावपळीचा आहे. पण विनाकारण धावफळ झाल्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कार्यात मन लागेल.कौटुंबिक समस्या सुटतील. राजकीय मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होईल. योजान सफल होणार पण कठोर मेहनत आहे.

तुळ: आजचा दिवस शुभ नाही तुमची खूप धावपळ होणार असून तुमची काळजी वाढणार आहे. तुमच्या स्वभावामुळे तुमचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. समस्यांचा डोंगर आहे, पण फोकस केलात तर त्यावर मात करु शकता. हवामानाचा प्रतिकूल प्रभाव प्रकृतीवर पडेल, त्यामुळे सावध राहावे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक: आजचा दिवस ठिक असून तुमचा सगळा वेळ परोपरकारात जाणार आहे. तुम्हाला आत्मिक समाधान मिळणार असून भौतिक सुखातही वाढ होईल. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढतील त्यामुळे काही सहकारी कदाचित नाराज होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग आहे.

धनु: आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला प्रत्येक कामात नकारात्मकता जाणवेल. तुम्ही संयम ठेवा आणि शांत राहून कामे करा किंवा निर्णय घ्या यामुळे परिस्थिती तुमच्या बाजून होईल. तुमचे प्रियजन आणि मित्र मदतीला येतील त्यामुळे तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. संध्याकाळी कुटुंबासोबत फिरायला जाणार आहात.

मकर: आजचा दिवस ठिक असून धनलाभाचे योग आहेत. व्यवसायात नवीन डील होणार आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. महत्त्वाचे काम करताना तसेच वाहन चालवताना ताणतणाव तुमच्यावर हावी होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांकडून काही योजना येतील त्यात जोखीम असण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा योजनांपासून दूर राहा.

कुंभ: आजचा दिवस ठिक असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आज अपेक्षेपेक्षा जास्त कमाई होणार आहे त्यामुळे तुम्ही गुंतवणुकिचा विचार करू शकता. वादविवादापासून दूर राहा. ऑफिसमध्ये काही कारणाने वादाची शक्यता आहे पण तुम्ही संयमाने वागा. कामात फोकस करा म्हणजे चूका होणार नाहीत. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होणार आहेत.

मीन: आजचा दिवस चांगला असून मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. ज्यांनी आपले करिअर सुरू केले आहे त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात मान प्रतिष्ठा वाढणार आहे. वादविवादापासून दूर राहा तसेच अपशब्द बोलणे टाळा. संध्याकाळी कुटुंबाला वेळ देणार आहात त्यामुळे ताणतणाव कमी होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

17 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

17 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

17 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

17 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

17 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

17 तास ago