क्राईम

घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला; एका आरोपीचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध, तपासाला वेग

शिरूर (अरुणकुमार मोटे) मांडवगण फराटा परिसरातील अकरावा मैल येथे बुधवारी (ता. १६ जुलै) रात्रीच्या सुमारास घरात घुसून १९ वर्षीय तरुणावर झालेल्या गंभीर प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोपींपैकी एका हल्लेखोराचे स्केच प्रसिद्ध केले आहे. या स्केचच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी ही माहिती दिली.

प्रज्वल दिगंबर पवार (वय १९, रा. अकरावा मैल, मांडवगण फराटा) या युवकावर बुधवार, १६ जुलै रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास जेवणाच्या वेळेत स्वयंपाक घरातच दोन अज्ञात इसमांनी थेट प्रवेश करून थरारक हल्ला चढवला. त्यावेळी प्रज्वल आपल्या आई-वडिलांसोबत जेवत होता. अचानक आलेल्या दोघांपैकी एकाच्या हातात पिस्तूलासारखे हत्यार होते, तर दुसऱ्याच्या हातात धारदार शस्त्र.

घरात घुसताच या हल्लेखोरांनी काही क्षण पवार कुटुंबावर दहशत निर्माण केली आणि त्यानंतर प्रज्वलच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने जबर वार केले. या हल्ल्यात प्रज्वल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संदर्भात प्रज्वलची आई राजश्री दिगंबर पवार (वय ४१) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. प्रज्वलच्या कुटुंबीयांच्या सहाय्याने आरोपींपैकी एकाचा चेहरा लक्षात घेऊन स्केच तयार करण्यात आले असून, ते सार्वजनिक करण्यात आले आहे.

या धक्कादायक घटनेनंतर अकरावा मैल व मांडवगण फराटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवर विविध तर्क-वितर्क आणि अफवा यांना उधाण आले आहे. ही वैयक्तिक दुश्मनी की इतर कोणतेही कारण, याचा तपास पोलीस विविध अंगाने करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक कसोशीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिरूर पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, स्केचमधील व्यक्ती ओळखल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. ही घटना केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर घाला आहे. पोलिसांचा तपास कसा वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणातील आरोपी लवकरात लवकर गजाआड जाण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

23 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago