Categories: भविष्य

Horoscope Today: जाणून घ्या आजचे राशिभविष्य…

मेष: आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करुन घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

वृषभ: खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

मिथुन: तुमचा आजचा दिवस उत्साहात जाईल. आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल.

कर्क: तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

सिंह: आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. घरातील सुख सोयींकडे विशेष लक्ष द्याल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील.

कन्या: तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा. फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील.

तुळ: घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा. जवळचा प्रवास घडेल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचे त्रास संभवतात.

वृश्चिक: आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल. कोणतेही साहस करतांना सावधानता बाळगावी. हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सतावतील. नातेवाईकांना नाराज करू नका. भागिदारीतून लाभ उठवाल

धनु: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल. जमिनीच्या कामात गती येईल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. समर्पक भावना दर्शवावी लागेल. वैचारिक दृष्टीकोन बदलून पहावा.

मकर: आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा. परिवारातील मंडळींची साथ लाभेल. सहकार्‍यांची वेळेवर मदत मिळेल. कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल. मनातील संभ्रम दूर सारावा. व्यावसायिक कामात अधिक वेळ द्यावा लागेल.

कुंभ: आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलाल.

मीन: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. सारासार विचारांवर भर द्यावा. स्वतंत्र विचारांची कास धराल. काही कामे अधिक कस पाहतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

1 तास ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

1 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

1 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

17 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago