मुख्य बातम्या

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात ओम साई क्रिकेट क्लबच्या वतीने पहिल्यांदाचं ‘शिवशंभो चषक २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गुरुवार (दि २४) रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत शिरुरसह श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघानी सहभाग घेतला आहे.

 

या स्पर्धेसाठी शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष एकनाथ वाळुंज यांच्याकडुन ४१ हजारांचे प्रथम बक्षीस, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे व योगीराज उद्योग समुहाचे अध्यक्ष राहुल कर्पे यांच्याकडुन ३१ हजारांचे द्वितीय बक्षीस, शिरुर नगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाचर्णे आणि शिंदोडी गावचे माजी सरपंच इंद्रभान ओव्हाळ यांच्याकडुन २१ हजारांचे तृतीय बक्षीस तर माजी सैनिक योगेश धावडे व कांदा व्यापारी अशोक वाळुंज यांच्याकडुन १५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

 

या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी सरपंच इंद्रभान ओव्हाळ, शिरुर भाजपाचे सरचिटणीस शरद ओव्हाळ, शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक शिवाजी ओव्हाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश वाळुंज, युवा कार्यकर्ते श्रीपाद वाळुंज तसेच क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

10 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

15 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

17 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

19 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago