रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात महिलांनी दुकानदाराची नजर चुकवत तब्बल ८२ नग चांदीचे जोडवे लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती येथील महावीर ज्वेलर्स या दुकानात असताना चार अनोळखी महिला दुकानात आल्या. त्यांनी चांदीचे जोडवे खरेदी करायचे असल्याचे सांगत विविध प्रकारचे दागिने दाखविण्याची मागणी केली. ग्राहक असल्याचे भासवत या महिलांनी बराच वेळ वेगवेगळ्या डिझाइनचे जोडवे पाहिले. वारंवार नवीन दागिने दाखविण्यास सांगत त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवले.
काही वेळानंतर कोणतीही वस्तू खरेदी न करता चारही महिला दुकानातून निघून गेल्या. महिला गेल्यानंतर दुकानाचे मालक प्रणय दिलीप वर्मा (वय ३०, रा. भांबर्डे रोड, रांजणगाव गणपती) यांनी दागिने आणि वस्तूंची पाहणी केली. त्यावेळी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले तब्बल ८२ नग चांदीचे जोडवे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दुकानात आलेल्या महिलांनी हातचलाखी करुन दागिने चोरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेत प्रणय वर्मा यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरोधात फिर्याद दिली आहे. दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित महिलांचा शोध घेण्यात येत आहे.
भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे रांजणगावसह परिसरातील सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दुकानात येणाऱ्या संशयास्पद ग्राहकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासह मौल्यवान दागिन्यांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार अमित चव्हाण हे करत आहेत.
सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत
शिरुर पोलिसांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पॅटर्नचे स्वागत; कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांना भरली धडकी
दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ
शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…
११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…