महाराष्ट्र

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका

नागपूर: पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, विद्यमान कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणीशी झालेल्या गैरवर्तनाचा निषेध करत वडेट्टीवार यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून अशा घटना घडणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.

पेपरफुटी रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे केवळ नवीन कायदे करून काहीही बदल होणार नाही, तर दोषींवर कठोर कारवाई आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

सोनम वांगचुक यांना २७ दिवस उपोषण करावे लागणे हे सरकारच्या अपयशाचे लक्षण असल्याची टीका करत, लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याशिवाय, मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी खासगी कंपनीमार्फत विकसित करण्यात आलेल्या नव्या पोर्टलवर नागरिकांकडून शुल्क आकारण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केला. कायद्यात स्पष्ट तरतूद नसताना सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकून खासगी कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, या निर्णयाला काँग्रेसकडून तीव्र विरोध केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

2 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

6 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

6 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

6 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

6 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

7 तास ago