मुख्य बातम्या

वढू बुद्रुक मध्ये अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

अजित पवारांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीवर लोटांगण घेऊन माफी मागावी

शिक्रापूर (शेरखान शेख): अखंड हिंदुस्तानचे आरोग्य दैवत धर्मवीर श्री. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चुकीचे विधान केल्याने राज्यातील तसेच देशातील जनतेच्या भावना दुखावल्या असून धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर ग्रामस्थ व शंभू भक्तांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

वढू बुद्रुक ता. शिरूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथील विधानसभेतील अधिवेशनामध्ये संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेतच असे बेताल व्यक्तव्य करुन तमाम महाराष्ट्राच्या असंख्य शंभू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, शंभूराजे धर्म रक्षणासाठी जगले व हिंदू धर्म रक्षणासाठीच प्राणाचे बलिदान केले, हे त्यांनी विसरता कामा नये, त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र पूर्ण अध्ययन केलेले नाही यावरुन त्यांची प्रचिती येते, त्यांनी सर्व मराठी माणसांचा अपमान केला आहे. त्याबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी येथे निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान अजित पवार यांनी समाधीस्थळी येऊन लोटांगण घेऊन माफी मागावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तसेच शंभूराजांचा पुण्यतिथीचा दिन हा धर्मवीर बलिदान दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी अनेकदा निषेध निषेध निषेध अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शंभू भक्त बबन दरगुडे, नामदेव पोटावडे, गुंडाभाऊ भंडारे, साधना गोलांडे, सुनिता भंडारे, उर्मिला भंडारे, कौशल्य यशवंत,अंजना भंडारे, नीता भंडारे, साधना भंडारे, शकुंतला चव्हाण, मंगल गाजरे, कल्पना नाणेकर, वनिता भंडारे, भामाबाई शिवले, बेबी भंडारे, सोनाली भंडारे, निर्मला भंडारे, सुनिता भोसले, संगीता आरगडे,अक्षता मोरे, रुपाली भंडारे, स्वाती भंडारे, नीलिमा देशमुख, पल्लवी रणदिवे, भिमाबाई भंडारे यांसह आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

यावेळी अजित दादा पवार यांच्या वक्तव्यावर तीव्र स्वरुपाचा निषेध करून यापुढे कुठलेही लोकनेत्यांनी छत्रपतींवर बोलू नये, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते, या पुढे अशा स्वरुपाचे प्रकार घडले नाही पाहिजेत, दादांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सिद्ध करुन दाखवावी आम्ही त्यांची पाठ थोपटू, नाहीतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी वर लोटांगण घेऊन जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे वक्तव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, साधना गोलांडे, कौसल्या यशवंत, सुनिता भंडारे यांनी प्रखर शब्दात व्यक्त केले. यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांना निवेदन देण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

17 तास ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago