शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी या नववर्षाच्या सुरुवातीलाच संतोष शिवाजी आरगडे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील संतोष आरगडे घरामध्ये झोपलेला होता रात्री 8 वाजण्याच्या सुमारास संतोषचा भाऊ अंकुश याने संतोषला आवाज दिला. मात्र त्यांने कोणताही प्रतिसाद न दिल्याने अंकुशने घराच्या पाठीमागे जाऊन खिडकीतून पाहिले असता संतोष घराच्या छताला दोरीच्या साह्याने लटकल्याचे दिसून आले.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस पाटील जयसिंग भंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत संतोषला खाली घेऊन शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी संतोष शिवाजी आरगडे रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याबाबत अंकूश शिवाजी आरगडे (वय ३५) रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक विकास पाटील हे करत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…