मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्याला कुदळीच्या दांडक्याने मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील पानमंद मळा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाकलेल्या लाकडांच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दोन शेजाऱ्यांनी हात उठवला. इतकेच नव्हे, तर डोक्यात कुदळीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे.

फिर्यादी केरभाऊ गेणभाऊ पानमंद (वय ६५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांचे शेजारी सुजित दिलीप पानमंद आणि दिलीप मारुती पानमंद यांच्यात रस्त्यावर टाकलेल्या लाकडांबाबत वाद झाला. “ही लाकडे तुम्हीच टाकली आहेत,” असा आरोप करत सुजित पानमंद यांनी गैरसमजाच्या भरात शिवीगाळ आणि दमदाटी केली.

फिर्यादी केरभाऊ यांनी वाद टाळण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, सुजित व त्याचे वडील दिलीप पानमंद यांनी त्यांना मारहाण केली. यावेळी सुजित पानमंद याने कुदळीच्या लाकडी दांडक्याने केरभाऊ यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. “पुन्हा आमच्याशी वाद घातला तर तलवारीने कापून टाकू,” अशी धमकीही दिली गेली.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अधिकारी म्हणून पो.ह. आगलावे यांच्याकडे तर अंमलदार पो.ह. शिंदे यांच्याकडे दाखल प्रक्रिया असून, प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या देखरेखीखाली प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा शेजाऱ्यांतील वाद हिंसक वळण घेत असल्याचे या घटनेवरून दिसून येते. नागरिकांनी अशा प्रसंगी संयम बाळगावा आणि कायदा हातात न घेता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे .

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

8 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

12 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

12 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

12 तास ago