गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे केला अर्ज दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): साबळेवाडी (ता. शिरूर) येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यानंतर आता चांडोह गावातील अतिक्रमण कधी हटवले जाणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
चांडोह येथे काही व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवर रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर बांधकामे करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणांविरोधात एका नागरीकाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, चांडोह गावात रस्त्यालगत वळणावर काही लोकांनी बांधकाम करून त्यास पुढे पत्राची खोली काढून अतिक्रमण केले आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच याठिकाणी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून दुकाने सुरू केले आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून अतिक्रमण काढणे बाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
साबळेवाडी येथील कारवाईनंतर प्रशासनाने आता चांडोह गावातील बेकायदेशीर अतिक्रमण ताबडतोब काढून टाकावे , अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…