मुख्य बातम्या

नगर -पुणे रस्त्यावर बेकायदेशीर दारु वाहतुक करणाऱ्या दोन जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकातील गोवा वाईन्स येथून देशी-विदेशी दारुचा साठा घेवुन पुणे-नगर रोडने बेकायदेशीर वाहतुक करताना दुचाकी वाहनासह दोन जणांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असुन रामदास हरिभाऊ शिंदे (वय 32) सध्या रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) आणि 2) धनाजी विठ्ठल साळुंके (वय 33) सध्या रा. लांडेवस्ती, रांजणगाव ग, ता. शिरुर, जि. पुणे. (मुळ रा. नेरले. ता. करमाळा, जि. सोलापुर) अशी अटक केलेल्या व्यक्तीची नावे असुन याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार (दि 10 ) रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे हे तिघेजण नगर-पुणे रस्त्यावर खाजगी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना दत्तात्रय शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, यश इन चौकातील गोवा वाईन्स येथुन दोनजण देशी-विदेशी दारुचा साठा घेवुन नगर पुणे हायवे रोडने पुणे बाजुकडे थोड्या वेळाने जाणार आहेत. त्यावेळी पोलिसांनी नगर-पुणे हायवे रोडलगतच्या हॉटेल शांताई येथे सापळा लावला. त्यावेळी नगर -पुणे रोडने एक पांढ-या रंगाच्या बुलेटवरती (गाड़ी क्रं MH 14 CL 0036) दोन जण रांजणगावच्या बाजुकडे जातांना दिसले. त्यांच्या दोघांच्या मध्ये एक बॉक्स ठेवलेले होते.

त्यावेळी पोलिसांनी त्यांना इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगीतली. परंतु त्यांनी गाडी न थांबविता जोरात पुणे बाजुकडे पळविली. त्यावेळी पोलिसांनी खाजगी गाडीमधुन त्या मोटार सायकलचा पाठलाग करुन काही अंतरावर थांबविले. त्यावेळी या दोघांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे असणाऱ्या बॉक्सची पहाणी केली असता त्यामध्ये देशी-विदेशी दारुचा प्रोव्हिशन गुन्हयाचा माल मिळुन आला. त्यामध्ये जप्त केलेल्या दारुच्या बटल्यांची एकुण 11 हजार 400 रुपयांची दारु आणि 1 लाख 50 हजार रुपयांची बुलेट गाडी असा एकुण 1 लाख 61 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नवीन मार्केट यार्ड घावटे कॉम्प्लेक्स येथे वाहन कर्जाच्या झालेल्या व्यवहाराचा…

12 तास ago

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

पुणे: पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या चार गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या…

17 तास ago

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

छत्रपती संभाजीनगर : एका एसटी बसमध्ये दोन वृद्धांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. संबंधित घटनेचा व्हिडिओ…

17 तास ago

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही…

1 दिवस ago

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय…

2 दिवस ago

विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन शेळ्याही जागीच दगावल्या…

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची…

2 दिवस ago