मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक युवक आणि युवतींची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक होत असुन याबाबत सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये रांजणगाव MIDC मध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने कशी लूट केली जाते. याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

 

सध्या महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत. सगळ्याच उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी भेटत नाही. म्हणुन मिळेल ती नोकरी स्वीकारुन ते काम करतात. याचाच फायदा घेत पुण्यातील काही प्लेसमेंट वाल्यांनी टोळीने घेतला असुन वर्तमानपत्रात नोकरी संदर्भात छोट्या जाहिरातीत रोज एक जाहिरात येते. जाहिरातीतील मजकूर पुढीलप्रमाणे असतो.

रांजणगाव MIDC कंपनीत पर्मनंट भरती सुरु आहे.

पात्रता: १० वी व १२ वी कोणतीही पदवी असलेले.

पगार १६००० ते २४००० + राहणे, जेवण

संपर्क:- मो…….

असा मजकूर त्या जाहिरातीत असतो.

 

त्या नंबर वर कॉल केला तर एक महिला बोलते.ती जाहिरातीतील माहितीच कॉल वर सांगते. बाकीची माहिती तुम्हाला इथे आल्यावर सांगतली जाईल असे म्हणते आणि येताना २००० रुपये आणि २ पासपोर्ट साईज फोटो आणि ओळखपत्र घेऊन या हे न विसरता सांगते. पत्ता विचारला असता रांजणगाव (ता. शिरुर) ला उतरल्यावर कॉल करा आम्ही तुम्हाला घ्यायला येतो असे सांगितले जाते.

 

नोकरीची गरज असलेली मुलं त्यांच्या बोलण्यात फसतात. त्यानंतर रांजणगावला गेल्यावर प्लेसमेंट वाल्यांना कॉल केला कि, ते म्हणतात गणपती मंदिर समोर हायवे वर थांबा. लगेच १० मिनिटात त्यांचा एक व्यक्ती गाडीवर येतो. कॉल तुम्हीच केलता का…? विचारतो आणि पैसे आणलेत का…? हे पण विचारतो. त्याला तुमचं ऑफिस कुठे आहे असं विचारल तर तो म्हणतो पैसे द्या लगेच जॉइनिंग करुन घेतो. आता इतक्या लांब गेल्यावर नोकरीची गरज असलेल्या युवकांना त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागतो.

 

गरजु युवकांची अशी होतेय फसवणुक… 

त्यानंतर संबंधित व्यक्ती त्यांना गाडीवर घेऊन रांजणगावच्या एका चौकात नेतो. तिथे तो २००० रुपये आणि फोटो, ओळख पत्र घेतो. त्याला पावती मागितली असता संध्याकाळी तुमच्या रुमवर आणुन देतो असं सांगत. आमचा दुसरा एक व्यक्ती येईल आणि तुम्हाला तुमच्या रूम मध्ये घेऊन जाईल.असं सांगत पहिला व्यक्ती जातो. लगेच 5 मिनिटात तो दुसरा व्यक्ती येतो तो विद्यार्थ्याला घेऊन त्याच चौकातुन ५ ते ६ किमी अंतरावरील एका खेडेगावात घेऊन जातो. त्यानंतर तिथ गेल्यावर तुमची राहायची व्यवस्था मी केली आहे असं सांगत आणि बळजबरीने युवकांकडुन तो ५०० रुपये घेतो.

 

युवकांचा होतोय भ्रमनिरास….

नोकरीची गरज असलेल्या युवकांना आपली फसवणुक होतेय हे लक्षात येते. पण गावापासून खुप लांब असल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. तिथे पहिल्यापासुनच अशीच फसवणुक झालेले काही युवक असतात. काहीच पर्याय नसल्यामुळं ते तयार होतात. त्यांनी एकमेकांची विचारपूस केली असता कोणी लातूर, धुळे,औरंगाबाद, सोलापूर अश्या वेगवेगळ्या भागातून पेपर मधली जाहिरात वाचून तेसुद्धा आलेले असतात. तसेच कोणाकडुन तीन हजार तर कोणाकडुन पाच हजार घेतलेले असतात.

 

ट्रेनिंगच्या नावाखाली पत्र्याच्या शेडमध्ये काम…

त्यानंतर या सर्व युवकांना ट्रेनिंगच्या नावाखाली एका पत्र्याच्या शेडमध्ये काम करायला लावले जाते. त्यानंतर त्या युवकांच्या लक्षात येत की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला लावण्याच्या नावाखाली आपली मोठी आर्थिक फसवणुक करण्यात आलीये. या विरोधात कोणी आवाज उठवला. तर त्याला स्थानिक गुंडाकडुन बेदम मारहाण केली जाते. त्यामुळे घाबरुन अनेक युवक रात्रीचं सगळा पसारा आवरुन थेट घर गाठतात.

 

रांजणगाव पोलिसांची जाणीवपुर्वक डोळेझाक…?

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत एवढा गंभीर प्रकार घडत असतानाही पोलिस प्रशासन जाणीवपुर्वक याकडे डोळेझाक करत असल्याचे काही फसवणूक झालेल्या युवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ठेकेदाराने आमचे पगाराचे पैसे बुडवल्याने आम्ही पोलिसांकडे तक्रारही केली. परंतु पोलिसांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. उलट फक्त आज ये, उद्या ये, परवा ये असं करत ‘तारीख पे तारीख’ दिल्याने शेवटी आम्ही तिकडे जाणच बंद केलं असं त्यांनी सांगितले.

(क्रमश:)

शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक

शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान

शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

4 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

4 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

5 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

10 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

10 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

10 तास ago