मुख्य बातम्या

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुणे-नगर महामार्गावर असलेल्या कारेगाव येथील यश इन चौकात खुले आम वेश्या व्यवसाय चालु असुन रांजणगाव पोलिस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालय येथुन हाकेच्या अंतरावर असताना या ठिकाणी नक्की कुणाच्या आशिर्वादाने…? हा वेश्या व्यवसाय चालु आहे अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

 

रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत यापुर्वीही यश इन चौकात असणाऱ्या एका चार मजली इमारतीत वेश्या व्यवसाय चालु होता. त्यावर पुणे ग्रामीण अधिक्षक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने कारवाई करत त्या इमारतीच्या मालकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही दिवस सगळीकडे शांतता होती. परंतु रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका हॉटेल मध्ये परत एकदा वेश्याव्यवसाय सुरु झाला असल्याची खात्रीलायक माहिती असुन यावर रांजणगाव पोलिस कारवाई करणार का…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

 

यश इन चौक झालाय अवैध व्यवसायांचा अड्डा…?

रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत सध्या गुटका, मटका, गावठी दारु तसेच गांजा विक्री असे अनेक अवैध व्यवसाय सुरु आहेत. तसेच येथे मोठे दारुविक्री करणारे दुकान असल्याने सायंकाळच्या वेळेस यश इन चौकात मोठया प्रमाणात तळीरामांची गर्दी असते. त्याच्याच काही अंतरावर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु असल्याने या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या महिला कामगारांची विनाकारण कुचंबना होते.

 

सामाजिक कार्यकर्त्याचे निवेदन पण परिस्थिती ‘जैसे थे’

याबाबत काही दिवसांपुर्वी एक सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेनी शिरुरचे उपविभागीय अधिकारी आणि रांजणगाव पोलिस स्टेशनला याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवस हा सगळा प्रकार थांबला होता. परंतु त्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणाहुन पोलिस स्टेशनला जाण्या-येण्याचा रस्ता आहे. अनेक पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी अनेकवेळा येथूनच पोलिस स्टेशनला जात असतात. मग त्यांना हा सगळा गैरप्रकार दिसत नाही का…? किंवा हा सगळा गैरप्रकार दिसुनही पोलिस त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष तर करत नाहीत ना…? अशीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

गुनाट गावच्या सरपंचपदी रामदास काकडे यांची निवड; प्रदीप कंद गटाकडे सत्ता कायम

शिरुर तालुक्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत कांदा व बाजरी पिकाची नोंद

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago