मुख्य बातम्या

शिरूर तहसिल कार्यालयात दिशादर्शक/माहिती फलक बसवण्यास अखेर यश…

नागरिकांमधून समाधान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यास यश

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तहसिल कार्यालय तथा नवीन प्रशासकीय इमारत ही तालुक्यातील एक प्रमुख प्रशासकीय इमारत असून या इमारतीमध्ये शासकीय विभागाची विविध कार्यालय आहे, असे असतानाही आदर्श कार्यालय संहितेनुसार सदर कार्यालयामध्ये दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने कोणते कार्यालय कुठे आहे हेच नीट समजत नव्हते. त्यामुळेच विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी कुचंबणा होत होती.

सदर बाब २ ऑगस्ट२०२४ रोजी सामाजिक कामानिमित्त तहसील कार्यालयात गेलेले सामाजिक कार्यकर्ते शिवाजी आबा खेडकर व निलेश वाळुंज यांच्या लक्षात आली. याबाबत यांनी त्याच दिवशी तहसीलदार शिरूर यांना आदर्श कार्यालय संहितानुसार फलक लावण्यात यावेत अशा आशयाचे लेखी निवेदन दिले होते. यानंतर वाळुंज यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार शिरूर यांनी (दि. 1) ऑक्टोबर२०२४ रोजी उप-अभियंता सार्वजनिक बांधकाम शिरूर यांना सदर इमारती समोर व कार्यालयात आदर्श कार्यालय संहितेनुसार दिशादर्शक फलक लावण्याबाबतचे पत्र पाठवले होते.

परंंतु त्यानंतरही कार्यवाही झाली नसल्याने निलेश वाळुंज यांनी पुन्हा (दि. १६) जानेवारी२०२५” रोजी या संदर्भात तक्रार केली त्.यानंतर तहसीलदार शिरूर यांच्याकडून २२जानेवारी २०२५ रोजी उप-अभियंता सार्वजनिक बांधकाम शिरूर यांना स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतर या पत्राची दखल घेत नवीन प्रशासकीय इमारती मधे दिशादर्शक फलक बसवण्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. फलकांवर दर्शवल्यानुसार तळ मजल्यावर उपहारगृह व वाहनतळ आहे.पहिल्या मजल्यावर तहसीलदार यांचे दालन, महसूल शाखा निवासी नायब तहसीलदार कक्ष, सेतू, दुय्यम निबंधक श्रेणी१, महसूल नायब तहसीलदार,पुरवठा शाखा आहे.

दुसऱ्या मजल्यावर- तालुका कृषी अधिकारी, अभिलेख शाखा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कार्यालय निरीक्षक वैद्य मापन शास्त्र शिरूर, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, वनपरिक्षेत्र धिकारी सामाजिक वनीकरण, जमीन संकलन शाखा महसूल कार्यालय, निवडणूक शाखा, संजय गांधी निराधार शाखा आहे. तर तिसऱ्या मजल्यावर- व्हीआयपी सूट, कॉन्फरन्स हॉल,अभिलेख कक्ष तालुका कृषी अधिकारी कार्यालय, समादेशक अधिकारी शिरूर तालुका होमगार्ड पथक कार्यालय असून प्रथमच लावण्यात आलेल्या या दिशादर्शक फलकांमुळे कार्यालयाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे येणाऱ्या नागरिकांची जी दिशाभूल होत होती कुचुंबना होत होती ती आता यामुळे नक्कीच थांबेल यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

आदर्श कार्यालय संहितानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये दिशादर्शक फलक बसवणे आवश्यक आहे जेणेकरून येणाऱ्या नागरिकांना ज्या कार्यालयामध्ये किंवा ज्या विभागांमध्ये जायचं आहे तिथे जाणे सोयीस्कर होईल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीआबा खेडकर आणि आम्ही याबाबत निवेदन दिले होते त्यानंतर बराच पाठपुरावा करावा लागला बर्‍याच प्रयत्नानंतर सदर काम प्रत्यक्षात मार्गी लागले याचे समाधान होत असले तरी नियमानुसार जी कामे शासकीय कार्यालयांत स्वप्रेरणेने होणे आवश्यक आहेत त्यासाठी नागरिकांना एवढा पाठपुरावा करावा लागतो याचीही खंत वाटते.

निलेश यशवंत वाळुंज 

(सामाजिक कार्यकर्ते)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

53 मिनिटे ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

22 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago