आरोग्य

तुम्ही पण चुकीच्या पद्धतीने ब्रशवर टूथपेस्ट लावता का पाहा योग्य पद्धत कोणती

दातांची व ओरल हेल्थची काळजी घेण्यासाठी आपण सगळेच सकाळी उठल्यावर आधी ब्रश करतो. लहानपणापासूनच आपल्याला दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश व टूथपेस्टने दात घासण्याचा सल्ला दिला जातो. दररोज ब्रश केल्याने दात किडणे, हिरड्यांचे रोग, तोंडातील वाईट बॅक्टेरिया आणि प्लाक काढून टाकण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर ब्रशवर टूथपेस्ट घेऊन आपण दात घासतो. दात घासताना आपण ब्रश वापरुन संपूर्ण तोंड आणि दात घासून स्वच्छ करतो

दात घासताना आपण ब्रश संपूर्ण तोंडात फिरवतो पण आपल्या तोंडात काही भागांपर्यंत ब्रश पोहाचु शकत नाही. काहीवेळा आपण आपल्या नेहमीच्याच पद्धतीने दात घासतो. अशावेळी दातांच्या काही भागांच्या स्वच्छतेचा आपण विचारच करत नाही. यामुळे दात वरवर स्वच्छ होऊन आतून खोलवर स्वच्छ न केल्यास दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात.

दात घासताना अशी घ्या काळजी

१) दातांच्या आतील भाग: दात घासताना आपण शक्यतो डोळ्यांना दिसेल इतकाच दातांचा भाग घासतो. दात आपण वर – खाली अशा सगळ्या बाजूंनी घासले तरीही दातांच्या आतील भागाची आपण तितकीशी स्वच्छता करत नाहीत. नेहमीप्रमाणे दात फक्त वरुन घासणे इतकेच गरजेचे नसते तर दातांच्या आतल्या भागाची देखील तितकीच खोलवर स्वच्छता करणे गरजेचे असते. जर दातांच्या आतील भागाची योग्य पद्धतीने स्वच्छता केली नाही तर दात किडू शकतात तसेच ओरल हेल्थही खराब होऊ शकते. यासाठीच दात घासताना ते नेहमी वरवर न घासता दातांची आतून खोलवर स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

2) हिरड्या: आपल्या दातांबरोबरच दातांच्या हिरड्यांमध्ये देखील अनेक प्रकारचे जिवाणू असतात. हिरड्यांमध्ये लपलेले हे जिवाणू आपली ओरल हेल्थ खराब करु शकतात. यासाठीच दातांसोबतच हिरड्यांच्या सफाईकडे देखील लक्ष दिले पाहिजे. ब्रश करताना तो थोडासा तिरका करून ४५ अंश झुकवून ब्रश केल्यास हिरड्यांवरील जिवाणूंची स्वच्छता नीट करता येते असे तज्ज्ञ सांगतात. दातांसोबतच हिरड्या देखील स्वच्छ करणे आवश्यक असते.

3) जीभ: आपल्या जिभेवर सर्वात जास्त प्रमाणात जिवाणू राहतात. जिभेवरील या जिवाणूंची वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छता केली नाही तर तोंडाच्या दुर्गंधी सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याचबरोबर आपल्या ओरल हेल्थवर देखील याचा वाईट परिणाम दिसू शकतो. यासाठीच दररोज दातांच्या सफाई सोबतच जिभेच्या स्वच्छतेकडे देखील तितकेच लक्ष द्यावे.

ब्रशवर टूथपेस्ट लावण्याची योग्य पद्धत

ब्रशवर टूथपेस्ट लावताना आपण ब्रशच्या टोकावरील भागावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या ब्रेसेस मध्ये टूथपेस्ट लावतो. परंतु ही चुकीची पद्धत आहे. कारण अशा पद्धतीने टूथपेस्ट लावल्याने अर्धी टूथपेस्ट तर काहीवेळा खालीच पडते. अनेकदा ब्रशवर लावलेली टूथपेस्ट आपल्या दातांजवळ पोहोचेपर्यंत अर्धी टूथपेस्ट बेसिनमध्ये पडून जाते. यासाठी ब्रशवर टूथपेस्ट लावताना ती आडवी न लावता वरच्या दिशेने टूथपेस्ट करत उभी लावून घ्यावी. जेणेकरून टूथपेस्ट ब्रशवरुन पडत नाही आणि ब्रशच्या टोकावरील भागावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या ब्रेसेसमध्ये जाऊन व्यवस्थित बसते, यामुळे ती टूथपेस्ट खाली पडत नाही. ब्रशवर टूथपेस्ट लावताना ती शक्यतो ब्रशच्या टोकावरील भागावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या ब्रेसेसच्या विरुद्ध दिशेने लावावी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

2 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

3 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

3 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

3 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

3 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

3 दिवस ago