Shirur Police Station
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरामधील पोद्दार पार्कीगमध्ये मध्ये उभ्या असलेल्या चार ट्रकच्या (दि १७) ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री तब्बल सात बॅटऱ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या होत्या. यामुळे शिरुर शहरामध्ये खळबळ माजली होती. शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप यांनी या चोरी बाबत तपास सुरु केला असता तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज तपासुन गोपणीय बातमीदाराकडून माहीती काढून पारधी वस्ती पाण्याची टाकी शिरूर येथील एक संशयित आर्यन एअरपोर्स पवार (वय१९) यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
सदर गुन्ह्यातील गेलेला माल शिरुर पोलिसांनी त्याच्याकडुन तात्काळ जप्त केला आहे. या कामी जगताप यांना शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार नितेश थोरात, रघुनाथ हाळनोर, पवन तायडे यांनी मदत केली आहे. एका रात्रीत चार ट्रकच्या तब्बल सात बॅटऱ्या चोरणारा चोरटा आर्यन एअरपोर्स पवार ( वय१९ वर्ष ) याला पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करुन नाथसाहेब जगताप यांनी आरोपी गजाआड केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिरुर;लाडक्या बहिणीला भिक्षा नको, सुरक्षा हवी म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने भर पाऊसात मुक आंदोलन
चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…
न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…