शिरुर (किरण पिंगळे-शेलार) ‘बहिणीला भिक्षा नको, सुरक्षा हवी’ असे फलक घेऊन आज शनिवार (दि २३) रोजी शिरुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मुक आंदोलन करण्यात आले. शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मुक मोर्चाला सुरवात करण्यात आली.
बदलापुरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनांचा तसेच असंवेदनशील सरकारचा निषेध करण्यासाठी सर्वांनी काळे झेंडे हातात घेऊन व काळी फित बांधुन पाऊसात मुक आंदोलन केले. यावेळी जणु पाऊस सांगत होता, हा अत्याचार तसेच विकृत लोकांच्या मनात असलेले घाणेरडे विचार धुऊन जावेत. पाऊसाने एकप्रकारे जणू या आंदोलनाला पाठींबाच दिला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिरुर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, युवकचे तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, अल्पसंख्यांकचे तालुकाध्यक्ष अजित सय्यद, मंगेश खांडरे, अमित शिर्के, ॲड रवींद्र खांडरे, सुरेश पाचर्णे, संगीता शेवाळे, राणी कर्डिले, गीता आढाव, शशिकला काळे, कल्पना पुंडे, प्रियंका धोत्रे, शीतल शर्मा, राणी शिंदे, सागर नरवडे, राहील शेख आदी उपस्थित होते.;
शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा
Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…