मुख्य बातम्या

ग्रामपंचायती पाठोपाठ सोसायटीही दामू घोडे गटाच्या ताब्यात…

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होणार दावेदार

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध पार पडली. आगामी जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही सोसायटीची निवडणुक दामुशेठ घोडे व राजेंद्र गावडे यांच्यासाठी फार महत्वाची होती. गावच्या बऱ्याच जणांना ही निवडणुक व्हावी व दोन्ही गटांकडून निवडणुकीत पैसे मिळावे अशी अपेक्षा होती. आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून नागरीकांबरोबर वाईट होण्यापेक्षा राजेंद्र गावडे यांनी पुढाकार घेत दामुशेठ घोडे यांच्याशी संपर्क करत ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

राजेंद्र गावडे यांनी सावध भुमिका घेत काही लोकांच्या साथीने मध्यस्थीची भूमिका बजावत दोन्ही बाजूने जागावाटपाबाबत तोडगा काढून गावडे गटाचे ५ आणि घोडे गटाचे ८ असा फॉर्म्युला वापरत अर्ज माघारीच्या दिवशी तडजोड करण्यात आली.

यात दामूशेठ घोडे यांनी बाजी मारली. व त्यांच्या गटाचा चेअरमन होणार असल्याचे ठरले. या सोसायटीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परीषद सीईओ प्रभाकर गावडे, व अॕड. वसुमती गावडे यांच्या नावाला मा. आमदार गावडे समर्थक व राजेंद्र गावडे यांनी जोरदार विरोध केला होता. पण शेवटी माघार घेऊन प्रभाकर गावडेंसह त्यांच्या पत्नीलाही संचालकपद बहाल करण्याची नामुष्की गावडे घराण्यावर ओढवली.

एकुणच मागील काही महीन्यांपुर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीच्या गावडे घराण्याला राष्ट्रवादीच्याच गटातील दामुशेठ घोडे यांच्यामुळे मोठा पराभव स्विकारावा लागला होता. पुन्हा सोसायटीच्या निवडणुकीत घोडे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी होणाऱ्या जिल्हा परीषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून कोणाला तिकिट मिळणार? याकडे नागरीकांचे लक्ष लागून राहीले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

16 तास ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

18 तास ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

3 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

3 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

3 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

4 दिवस ago