मुख्य बातम्या

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) ‘गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना आमच्या गावाला पाणी मिळण्यासाठी काय केलं याचं उत्तर द्या’ असं म्हणत पाबळ (ता. शिरुर) येथील अजित जाधव या युवकाने माजी खासदार आढळराव पाटील यांना भर चौकात चांगलच घेरलं.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पाबळ (ता. शिरुर) गावात प्रचारासाठी गेले असता त्यांना गावातील युवकांनी घेरलं आणि पाणी प्रश्नावर आढळरावांची बोलतीच बंद केली. शिरुरच्या पाबळ परिसरातील केंदूर, पाबळसह १३ गावांचा पाणी प्रश्न वर्षानुवर्षे भिजत पडलेला आहे. आजपर्यंत कोणत्याही नेत्याने त्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे त्या भागातील संतप्त शेतकरी, युवक गेल्या चार वर्षांपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. आढळराव पाटील १५ वर्षे खासदार होते त्याचबरोबर मंत्री दिलीप वळसे पाटील देखील या भागाचं गेले अनेक वर्षे नेतृत्व करतात. मात्र या गावांना सातत्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने आढळराव पाटील यांना पाबळ गावात प्रचाराला आल्यानंतर भर चौकात जाब विचारला.

 

आम्ही तुम्हाला गेली १५ वर्षे मतदान केलं, एवढंच नाही तर वळसे पाटलांना देखील आम्ही छातीठोकपणे मतदान देतो परंतु तुम्ही लोकांनी आमच्या या गावांच्या पाण्यासाठी नेमकं काय केलं…? कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही निवडणूक लढत आहात…? असा सवाल अजित जाधव या युवकाने आढळराव पाटलांना केला. त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आढळरावांची या युवकाने बोलती बंद केली. शेजारी उभे असलेले वळसे पाटलांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील हे देखील त्या युवकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू लागले परंतु, त्यांनाही प्रतिप्रश्न करत वळसे पाटलांना देखील छातीठोकपणे आम्ही मतदान केलंय असं म्हणत प्रदीप वळसे पाटील यांनाही त्या युवकाने निरुत्तर केलं.

 

आढळराव पाटील आणि वळसे पाटील या दोघांनाही आम्ही मतदान दिलं. पण या दोघांनी पण आम्हाला पाण्यासाठी आजपर्यंत फसवलं असल्याचे भर चौकात आढळराव पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना त्या युवकाने सुनावले. या दोघांच्या बाजूला भाजपचे स्थानिक पदाधिकारी भगवान शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते प्रकाश पवार हा घडत असलेला प्रकार निमूटपणे पाहत होते.

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago