मुख्य बातम्या

करडे येथे सरकारी गायरान जमिनीतून बेकायदेशीर मुरुमचोरी, महसूल विभागाचे दुर्लक्ष

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC च्या टप्पा क्रमांक तीनसाठी करडे-सरदवाडी या गावातील जमिनी शासनाने संपादित केल्या असुन या ठिकाणी सध्या काम सुरु झाले आहे. यामध्ये नव्याने सुरु होत असलेल्या स्टेरेऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सपाटीकरण करण्याचे काम चालु असुन या कामासाठी करडे येथील सरकारी गायरान गट नंबर 166 तसेच यालगत असणाऱ्या जमिनीतुन अंदाजे 20 हजार ब्रास मुरुम पोकलेनच्या साह्याने बेकायदेशीररीत्या चोरुन नेल्याची तक्रार येथील एका जागरुक नागरिकाने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रांजणगाव MIDC च्या तिसऱ्या टप्प्यासाठी करडे घाट येथे शासनाने जमीन संपादित केली असुन गेल्या सहा महिन्यांपासुन या जागेवर सपाटीकरण व इतर कामे चालु आहेत. परंतु सध्या सपाटीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारा मुरुम हा करडे येथील सरकारी गायरान गट नं 166 तसेच आसपासच्या गटातून चोरुन आणला जात असुन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असताना स्थानिक तलाठी, मंडलअधिकारी नक्की काय करतात. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. करडे येथील मुरुम चोरीबाबत गेल्या सहा महिन्यापासुन जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याकडे याबाबत लेखी तक्रारी करुनही मुरुमचोरी थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे.

शिरुर तहसिल कार्यालयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…?

शिरुर तालुक्यातील अनेक गावात गायरान जमिनीवर अतिक्रमण, गायरान जमिनीतील मुरुम विकणे, शासकीय जागेतील मुरुम चोरुन बेकायदेशीररीत्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्याना विकणे हे प्रकार दिवसाढवळ्या चालु असताना महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत असुन महसूल विभागाच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासुन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच ‘म्यानेज’ असल्याने या मुरुम चोरांवर कसलीच कारवाई होत नसल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा चालु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

23 मिनिटे ago

आई-बहीण, पत्नीबाबत अश्लील शिवीगाळ अन् जीभ कापण्याची धमकी

आमदार संजय गायकवाडांविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार पुणे: संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.…

32 मिनिटे ago

शिरुर; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत…

1 तास ago

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

6 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

20 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

20 तास ago