राजकीय

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज पवार बिनविरोध

शिरुर: घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज अशोक पवार यांची तर उपाध्यक्ष पदी पोपट भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली.

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश मिळविले. पॅनेलचे प्रमुख या नात्याने आमदार ॲड. अशोक पवार हेच कारखान्याचे अध्यक्ष होतील, असे गृहित धरले जात असतानाच अनपेक्षितपणे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिराज पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी पोपटराव भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी जाहीर केले.

आमदार अशोक पवार यांनी नव्या पिढीकडे कारखान्याची सूत्रे सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. घोडगंगा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ निवडणूकीत आमदार पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने वीस पैकी १९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. तर ऋषिराज पवार यांची ब वर्ग मतदार संघातून संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली होती. या निवडणूकीनंतर, आमदार पवार हेच पुन्हा अध्यक्ष होणार, अशी सर्वच पातळ्यांवर चर्चा सुरु असताना ऋषीराज पवार यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालत सर्वांना धक्का दिला.

आमदार अशोक पवार यांनी सलग २५ वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषवित कारखान्याची प्रगती, विस्तार व इतर प्रकल्पांतून विकास साधला होता. त्यामुळे तेच पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील, अशी राजकीय स्थिती होती. त्यांच्या निवडीचे केवळ सोपस्कार बाकी असल्याचे बोलले जात होते. मात्र, या सर्व शक्याशक्यता मोडून काढत आमदार पवार यांनी ऋषिराज पवार यांच्या माध्यमातून नव्या नेतृत्वाला संधी दिली.

यावेळी पक्ष निरीक्षक म्हणून दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात हे उपस्थित होते. यावेळी सुहास थोरात, दिलीप मोकाशी, रवी काळे,पोपट भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, मानसिंग पाचुंदकर, सचिन मचाले, नरेंद्र माने, संतोष रणदिवे, उमेश साठे, संभाजी फराटे, शिवाजी गदादे, वैशाली जगताप, मंगल कोंडे आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत…

49 मिनिटे ago

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

5 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

19 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

19 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

19 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

19 तास ago