मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी टोळी अखेर गजाआड, तब्बल ४८ गुन्हे उघडकीस

शिरुर (अरुणकुमार मोटे) विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी टोळी जेरबंद करून ४८ गुन्हे उघडकीस आले असून ५०० किलो ग्रॅम तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने जप्त करुन एकुण १४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी धडक कारवाई केली आहे.

 

पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरूर, दौंड उपविभागात मागील महिन्यात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले होते. विद्युत रोहीत्र चोरी गेल्याने परीसरातील शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होत होते आणि परीसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या.

 

तसेच विद्युत रोहीत्र हे दुर्गम भागात असल्याने चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही (CCTV) या द्वारे तपास होणे अवघड होते. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेवून योग्य ते मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली होती.

 

त्यानंतर तपास पथकांनी शिरुर पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यांची घटनास्थळे पडताळुन घटनास्थळाकडे येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत करुन तपास चालु केला. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) तीन तपास पथके रवाना करण्यात आली.

 

हि विद्युत रोहीत्र चोरणारी टोळी तळेगाव ढमढेरे परीसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून आरोपी १) विशाल खंडू पवार (वय २५) तांबेवाडी, वडगाव सावताळ ता .पारनेर, जि. अहमदनगर २) प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २६) रा.साकुर गाडेकर, ता. संगमनेर अहमदनगर ३) ओमकार अजित घोडेकर (वय ११) रा.साकुर घोडेकरमळा ता. संगमनेर, जि.अहमदनगर ४) आदेश सयाजी भुजबळ (वय १९) रा.साकुर हळदावस्ती, ता.संगमनेर, जि. अहमदनगर ५) हर्षल राजेंद्र शिंदे (वय २४) रा साकुर,गाडेकरमळा ता. संगमनेर जि.अहमदनगर ६) श्रीकांत शिवाजी जाधव (वय २२) रा. सातकरवाडी, दहीवडी ता.शिरुर जि.पुणे ७) करण नाना माळी (वय १९) रा.दहिवडी मांजरेवस्ती, ता.शिरुर, जि.पुणे मूळ (रा.वांगदरी ता श्रीगोंदा जि. अहमदनगर) ८) सोनू विकास धुळे (वय २८) रा. आंबळे ता.शिरुर, जि.पुणे, मुळ रा.वाडेबोल्हाई (थेऊर) ता. हवेली, जि पुणे यांना ताब्यात घेण्यात आले.

 

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्हयातील चोरी केलेला माल भंगारविक्री करणारा आरोपी १) दिपक पांडुरंग सांगळे (वय २७) रा.व्हाईटहाउस बोलेगाव फाटा, नागापूर ता. जि .अहिल्यानगर यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने त्याला सुद्धा गुन्हयाच्या कामी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीनीं गुन्हा करण्यासाठी पिकअप चारचाकी वाहनाचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे पिकअप चारचाकी वाहन, सहा मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या असुन त्यापैकी एक मोटार सायकल चोरीची आहे. तसेच गुन्हयात चोरी केलेल्या मालापैकी ५०० किग्रॅ वजनाच्या तांब्याच्या पट्टया व तारा हस्तगत करण्यात आलेल्या असुन एकूण (१४ लाख ५० हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच एकुण ४८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. गुन्हयातील आरोपी विशाल पवार याच्यावर एकुण ११ मालमत्ता (मोटार सायकल) चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे याच्यावर ३ गुन्हे दाखल असून तो ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीच्या गुन्हयात फरार आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, दौंड विभागाचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, योगेश लंगुटे, पोलिस उपनिरीक्षक अभिनीत साकंद, एकनाथ पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, सचिन घाटगे, अजित भुजबळ संजू जाधव, मंगेश नागरगोजे, स्वप्निल अहीवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, महिला पोलिस नाईक सुजाता कदम, शिरुर पोलिस स्टेशनचे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अंमलदार किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप, यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कोठडी मध्ये असुन शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; मात्र अधिकारी म्हणतात

शिरुर; शरद सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई

शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

4 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

5 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

5 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

5 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

5 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

7 तास ago