mahaganpati
रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात भाविकांनी महागणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. भाविकांच्या अलोट गर्दीने रांजणगावला अक्षरशः यात्रेचे स्वरुप आले होते.
आज (मंगळवार) अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर प्रांगणात आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात भाविकांसह महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यंदाच्या वर्षातील ही पहिलीच अंगारक संकष्ट चतुर्थी असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी तसेच सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.
अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त डॉ.ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.अंगारकीनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपुर्ण मंदिराला फुलांची सजावट व येथील गणेशभक्त तथा प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दत्तात्रय चव्हाण (रा.चंदननगर, पुणे) यांनी देवस्थान ट्रस्टला ५० हजार रुपये देणगी सुपूर्द केली. महागणपतीच्या चरणी भावेश कामदार या भाविकाकडून ५ कॅरेट केळी तर रांजणगाव सोसायटीचे उपाध्यक्ष विष्णू साळुंके यांच्या वतीने १००१ मोसंबीचा प्रसाद देण्यात आला. दुपारी येथील श्री महागणपती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ.ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ.तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांसह देवस्थान कर्मचारी व भाविक उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…
रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…