रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव, शेळकेवस्ती येथील भास्कर लांडे यांच्या शेतामध्ये जनावारं चारण्यासाठी गेलेले कैलास पांडुरंग दुंडे यांना (दि 22) गुरे चारत असतांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी पाहिले असता शेतातील लिंबाच्या झाडाजवळ एक चार ते पाच महिन्याचे पुरुष बालक बेवारस अवस्थेत दिसुन आले होते. त्यामुळे कैलास पांडुरंग दुंडे यांचे फिर्यादीरुन रांजणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बालकाला त्याचीच आई किरण संजय जगताप (वय 26) रा. कोंढापुरी ता शिरुर जि पुणे मुळ रा. जळगाव ता. बारामती जि पुणे हिने रांजणगाव गणपती येथे सोडले असल्याचे सिद्ध झाले असुन (दि 23) रोजी रांजणगाव MIDC पोलिसांनी किरण जगताप हिला अटक केली करत न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सदर आरोपीला आज (दि 26) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा या आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीस (दि 28) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे करत आहेत.
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…